पाच बालकांच्या “काँक्लीअर इम्प्लांट” शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

• संवाद आणि आस्था संस्थेच्यावतीने आवाहन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पाच बालकांवर श्रवण-वाचा दोष दूर करण्यासाठी “कॉंक्लीअर इम्प्लांट” ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संवाद आणि आस्था या संस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
    भाषा ही ऐकूनच शिकता येते व बोलण्यास मदत होते. कर्णबधीरतेमुळे ऐकू येत नाही. त्यामुळे भाषा विकास होत नाही. या दोषावर आधुनिक उपचार पद्धती म्हणजे कॉंक्लीअर इम्प्लांट (cochlear implant) शस्त्रक्रिया गरजेचीच असते. ही कानाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहे. या अगोदर मुंबई- पुण्यात होणारी ही शस्त्रक्रिया आता लॉकडाऊनमुळे कोल्हापूरात करण्यात संवादने यश मिळवले आहे. सध्या यामध्ये  पाच बालकांवर युध्दपातळीवर शस्त्रक्रिया होण्यासाठी लागत असलेल्या ३० टक्के रक्कमसाठी समाजातील दानशुरासह औद्योगिक विश्वाने मदत करावी, असे आवाहन समन्वयक संवाद आणि आस्था या संस्थाच्यावतीने शिल्पा हुजूरबाजार, यश राजीव हुजूरबाजार व स्वाती गोखले यांनी केले आहे. 
      या शस्त्रक्रियेमध्ये कानाच्या आतमध्ये यंत्र बसवले जाते. हे यंत्र कानाबाहेरील श्रवणयंत्रासारख्या दिसणाऱ्या यंत्राला जोडले जाते. यामुळे मुलास उत्तमरीत्या ऐकू येते. कॉक्लीअर इम्प्लांटमुळे बाळाला ऐकण्यास मदत होते. स्पीच थेरपीच्या सहाय्याने बाळ बोलू लागते आणि सामान्य माणसासारखे समाजात संवाद करू शकते. शिक्षणास अडथळा येत नाही. संवाद क्लिनीक गेली तीस वर्षे कर्णबधीरता या क्षेत्रात कार्यरत आहे. 
      गेल्यावर्षी ५ मुलांचे निदान होऊन ती शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. ही शस्त्रक्रिया खर्चिक असून एका मुलाच्या पूर्ण उपचाराचा खर्च आठ लाख इतका आहे. यातील ८० टक्के रक्कम शासकीय योजनासह इतर संस्थाच्या मदतीने उपलब्ध झाली असून या मुलांच्या पालकांना अजून २.५ लाख रुपये मदतीची आवश्यकता आहे. आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट व संवाद रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही रक्कम उभी करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती – सामाजिक संस्थानी तसेच औद्योगिक संस्थानी आपल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून (सीएसआर) मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सदर मदतीसाठी ८० – जी आणि 12-A ची     सुविधा देगणीदारांना मिळणार आहे. तरी इच्छुकांनी आस्था चॅरिटेबल इन्स्टिट्यूट अथवा संवाद वाचा श्रवणदोष उपचार केंद्र, भेंडे गल्ली, शिवाजी पुतळ्याजवळ कोल्हापूर येथे किंवा ०२३१-२५४१०७१ / ९१५६०४९०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *