विफा अंडर १७ युथ गर्ल्स लिगमध्ये सहभागासाठी संघ नोंदणीसाठी आवाहन

Spread the love

• कोल्हापूर जिल्ह्यातील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाला संधी
कोल्हापूर • प्रतिनिधी
       वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) च्यावतीने  मे-जून २०२२ मध्ये विफा अंडर १७ युथ गर्ल्स लिग २०२२-२३ घेण्यात येणार आहे.
      या लिगसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील क्लब, ॲकॅडेमी, स्कूल यांच्यापैकी एक संघ पाठविण्याबाबत विफाच्यावतीने कळविण्यात आलेले असून कोल्हापूर जिल्ह्यातील १७ वर्षाखालील मुलींचा एक फुटबॉल संघ पाठविण्यात येणार आहे.
     संघामधील खेळाडूंचा जन्म १ जानेवारी, २००५ नंतरचा व ३१ डिसेंबर २००७ च्या आतील असणे बंधनकारक आहे. तसेच खेळाडूचे कोविड-१९ लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले प्रमाणपत्र असणे आवश्यकच आहे.
      लिगमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सेंट्रलाईज्ड रजिस्ट्रेशन सिस्टम अंतर्गत संघाची नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. तरी या लिगमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छूक संघांनी आपल्या संघाचे नांव केएसए कार्यालयात २१ मार्च २०२२ पर्यंत रितसर नोंदवावे, असे आवाहन केएसएच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!