नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्याचे आवाहन


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
      जिल्ह्यामधील ग्रामीण भागात नवीन रास्तभाव धान्य दुकान देण्याकरिता सन २०२१ सालचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छूक संस्थांनी / महिला बचत गटांनी/ स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.
     पन्हाळा – गुडे/सोमवार पेठ, नावली, मौ. बहिरेवाडी, पिंपळे तर्फ सातवे, मौजे कोतोली व वारणा. कागल – बोरवडे, माद्याळ  व पिंपळगाव खुर्द. करवीर – शिरोली दुमाला,  येवती, खेबवडे व गर्जन, कळंबे तर्फ कळे, घानवडे, सोनतळी  व वसगडे. शाहुवाडी – मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली  व कोळगाव.आजरा – दाभिळ. गगनबावडा – पळसंबे, तळये बु. व खोकुर्ले अशा एकूण २६ गावांसाठी नवीन रास्तभाव धान्य दुकानांकरिता अर्ज करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
     नवीन रास्तभाव धान्य दुकानाकरिता अर्ज करण्यासाठी वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
संस्थांना अर्ज करण्यास मुदत –  दि. २० सप्टेंबरपर्यंत. प्राप्त अर्जाची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पुर्ण करणे – दि. २१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर. नवीन दुकाने मंजुर करणे- दि. २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२१ असे आहे.
     अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा.अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष व अटी शर्ती संबंधीत तहसिल कार्यालय, पंचायत समिती, गाव  चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *