कोल्हापूर • प्रतिनिधी
महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
ही नियुक्ती पत्रे सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात पात्र वारसांना देण्यात आली. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेता शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन पाटील, आदिल फरास, विनायक फाळके आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या मंजुर आस्थापनेवरील रिक्त कनिष्ठ लिपीक, मुकादम तथा लिपीक व पहारेकरी या पदावर पात्र वारसदारांना नियुक्तीस प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मान्यता दिली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्वेता शिंदे, संकेत शिंदे, शुभम जिरंगे, सुशांत कांबळे, रोहित जाधव, सौरभ तावडे, बालमुकुंद पाटील, चंद्रकांत बुचडे, सुनिल करडे, वर्षा भंडारे, दत्ता डवरे, शिवाजी पाटील व श्रीधर कांबळे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पोवार, प्रभारी प्रशासक तथा अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड उपस्थित होते.
——————————————————-