घोडावत विद्यापीठामध्ये अ‍ॅडजंट फॅकल्टी म्हणून परदेशातील नामवंत प्राध्यापकांची नियुक्ती

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठामध्ये परदेशातील नामवंत विद्यापीठातील प्राध्यापक व वैज्ञानिक यांची अ‍ॅडजंट फॅकल्टी म्हणून नियुक्ती केल्याची माहिती कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     यामध्ये अमेरिकेतील सॅनजोश स्टेट युनिव्हर्सिटीच्या ऐरोस्पेस इंजिनीरिंग विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. निकोस मार्तोस, जे सध्या एअरक्राफ्ट डिझाईनवरती सध्या पुढील संशोधन करीत आहेत. न्यूझीलंड येथील ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. गाय लिट्लफेअर ज्यांनी विविध देशात संशोधनाचे कार्य केले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियातील काही नामवंत प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यामध्ये स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्कुल ऑफ सायन्सचे डीन प्रा. ऍलेक्स स्टोजेसव्हस्की, जे सध्या अडवान्सड स्टॅटेस्टिकस, बिग डेटा वरती संशोधन करीत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या क्लाऊड कम्प्युटिंग डिस्ट्रीब्युटेड लॅबचे संचालक डॉ. राजकुमार बुय्या यांनी याआधी मांजरासॉफ्ट या नामवंत कंपनीचे सीईओ काम पाहिले आहे. नामवंत मोनॅश विद्यापीठातुन पी.एचडी पदवी मिळवून विविध देशात इंडस्ट्री व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा.डॉ.अजिथ अब्राहम यांनी संगणकीय बुद्धिमत्ता, नेटवर्क सुरक्षा, सेन्सर नेटवर्क, ई-कॉमर्स, वेब इंटेलिजन्स या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. इसाका मेलबर्न चे व्हाईस प्रेसिडेंट आणि बोर्ड मेंबर आशुतोष कापसे हे सध्या आयओओपी होल्डिंग कंपनीचे सायबर सिक्युरिटी हेड म्हणून काम पाहत आहेत. स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागाचे प्रा.अंबरीश कुलकर्णी, जीएमआर वरलक्ष्मी फौंडेशनचे शिक्षण संचालक डॉ.जे. गिरीश, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मारी क्युरी फेलो वैज्ञानिक डॉ.नानासाहेब थोरात, मॉरिशस येथील अमिटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. धनंजय केसकर ज्यांनी भारत आणि मॉरिशसमधील कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. ऑस्ट्रेलियातील डेकिन विद्यापीठातून पी.एचडी पदवी धारण करून पॉवर सिस्टम ऑपरेशन व रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजी क्षेत्रात दैदिप्यमान काम करणारे डॉ. आरंगराज विनयगम यांचा समावेश आहे.
     याबद्दल कुलगुरु डॉ.अरुण पाटील म्हणाले ”या सर्व व्यक्ती परदेशातील नामवंत विद्यापीठात त्यांच्या क्षेत्रात मातब्बर असून भविष्यात त्यांच्या सहयोगाने घोडावत विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्लोबल एक्सपोजर मिळण्यासाठी हे विद्यापीठ कटिबद्ध आहे. या सर्व व्यक्तींकडून येथील विद्यार्थी व प्राध्यापकांना सर्वच बाबतीत मार्गदर्शन मिळणार आहे.”
      घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी निवड झालेल्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!