केएमटी उपक्रमाच्या व्यवस्थापकपदी टिना गवळी यांची नियुक्ती

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी  
      के.एम.टी. उपक्रमाच्या अति.परिवहन व्यवस्थापकपदी महाराष्ट्र शासनाकडून श्रीमती टिना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती गवळी यांनी मंगेश गुरव यांच्याकडून अति.परिवहन व्यवस्थापक पदाची सुत्रे स्वीकारली. 
      श्रीमती गवळी सन २०१० पासून शासकीय सेवेत असून त्यानी यापूर्वी जयसिंगपूर, कागल, मुरगूड येथे मुख्याधिकारीपदी तर सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिकेकडे सहा.आयुक्त या पदावर काम केले आहे. सध्या त्या औरंगाबाद महानगरपालिकेकडे उपआयुक्त या पदावर कार्यरत होत्या.
      मंगेश गुरव यांनी केएमटी उपक्रमासाठी कायमपणे सहकार्य राहील, असे मनोगत व्यक्त केले. श्रीमती गवळी यांनी आर्थिक अडचणींवर मात करुन तोटा भरुन काढण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी केएमटीकडील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!