घोडावत विद्यापीठाच्या डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमास पीसीआय-यु/एस-१२ ची मान्यता


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाच्या डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमाला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यु/एस -१२ ची (पीसीआय) मान्यता मिळाली आहे. तरी यामुळे संजय घोडावत विद्यापीठातून डिप्लोमा इन फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे रजिस्ट्रेशन असणाऱ्यांना औषधशास्त्र व्यवसायामध्ये शासनाची मान्यता मिळते त्यामुळे संस्थांना पीसीआयकडून अशी मान्यता मिळणे अत्यंत महत्वाचे असते.
     याबाबत बोलताना स्कुल ऑफ फार्मसीचे डीन डॉ. शिरीषकुमार आंबवडे म्हणाले की, संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फार्मसीने सुरुवातीपासूनच पीसीआयसाठी लागणाऱ्या व विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांची पूर्तता काटेकोरपणे केली आहे. आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण आणि उद्योजकतेसाठी लागणारे कौशल्य विकसित करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.
     याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्रभारी कुलगुरू व अकॅडमिक डीन डॉ. एम. टी. तेलसंग, प्रभारी कुलसचिव डॉ. एन. के. पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी फार्मसी विभागाचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *