गोकुळ दूध संघास भारत पेट्रोलियमच्‍या पेट्रोल पंपास मंजूरी

Spread the love

गोकुळ दूध संघास भारत पेट्रोलियमच्‍या पेट्रोल पंपास मंजूरी 
कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ प्रकल्‍प येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. या कंपनीचा पेट्रोल व डिझेल पंप मंजूर झालेला आहे. बी.पी.सी.एल.चे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी यांनी संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील  यांच्याकडे आज संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालयामध्‍ये मंजूरीचे पत्र सुपूर्द केले.
     यावेळी बोलताना चेअरमन विश्‍वास  पाटील म्‍हणाले कि, गोकुळ दूध संघाची अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी पेट्रोल पंपाची मागणी पुर्णत्‍वास आली आहे. सदर पंपाची उभारणी गोकुळ शिरगाव एम.आय.डी. सी. येथील संघाच्‍या जागेत हायवेकडील बाजूस करण्यात येणार आहे. ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळणार असून यामुळे सदर पेट्रोल पंप ग्राहकांच्‍या पसंतीस पडेल. या पंपाचा लाभ गोकुळ संलग्न दूध वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना तसेच संघाचे कर्मचारी  व भागातील नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या पंपाच्‍या मंजूरीसाठी जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या मंजूरी करीता संघाच्‍या सर्व संचालक मंडळाने व अधिकारी यांनी प्रयत्‍न केले आहेत.
     यावेळी जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगले, बाळासो खाडे, बी.पी.सी.एल.चे गोवा मॅनेजर अभिजीत पानारी, अधिकारी संतोष साहणी, नानासाहेब सुगावकर, कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!