पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी दक्षता बैठक घ्या : आ. चंद्रकांत जाधव


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी व्यापक दक्षता बैठक आयोजीत करावी, अशी सुचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केली आहे.
     कोल्हापूरात २०१९ मध्ये महापूराने हाहाकार उडवला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. २०१९ चा अनुभव पाठीशी असल्यामुळे गेल्यावर्षी योग्यवेळी घेतलेली दक्षता व पूर्व नियोजन यामुळे पुरपरिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य झाले होते. यावर्षीही चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे कोरोनाबरोबर संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन पूर परिस्थितीच्या पुर्व नियोजनासाठी त्वरीत बैठक आयोजीत करावी.
     या बैठकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलीक, खा. संभाजीराजे छ्त्रपती, खा. धैर्यशील माने, जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व संबंधीत विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करावे. यामुळे कोरोना व संभाव्य पूरस्थिती अशा दोन आपत्तींच्या आघाडीवर लढताना प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व नागरिकांची तारांबळ टाळता येणे शक्य आहे, असे मत आमदार जाधव यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *