नाना पटोले यांना अटक करून गुन्हा दाखल करा: भाजपाची निदर्शने

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याच्या निषेधार्थ बुधवारी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. नाना पटोले यांचा धिक्कार करून नाना पटोले यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देत पुतळ्याचे दहन केले.  
     याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर भाजपाच्यावतीने नाना पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारून हा पुतळा दहन करण्यात आला. या पुतळ्या भोवती बोंब मारत भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेधाची होळी केली.
      भाजपाच्या या निदर्शनानंतर भाजपा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन, भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन, भाजपा ओबीसी मोर्चाने लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे FIR नोंद करण्यास गेले असता प्रशासनाच्यावतीने गुन्हा नोंद करून घेण्यात आला नाही. सदर घटना भंडारा जिल्ह्यात घडली असल्याने त्याठिकाणी हा गुन्हा नोंद करता येईल, त्याचबरोबर त्याठिकाणी कोणती कारवाई करणात आली आहे याची माहिती आपल्याला दिली जाईल असे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांना सांगितले. यानंतर भाजपाच्यावतीने लेखी तक्रारीचे निवेदन संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक कार्यालय याठिकाणी देण्यात आले.  
      बिंदू चौक येथे झालेल्या या निदर्शनास दिलीप मैत्राणी, गणेश देसाई, राजू मोरे, संजय सावंत, चंद्रकांत घाडगे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, अजित सूर्यवंशी, विजय अग्रवाल, दिग्विजय कालेकर, भारती जोशी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, भरत काळे, विजयसिंह खाडे-पाटील, विवेक वोरा, अनिकेत मुतगी, सुनील पाटील, अभिजीत शिंदे, विशाल शिराळकर, आजम जमादार, नरेंद्र पाटील, मंगला निपाणीकर, सुनिता सूर्यवंशी, सुजाता पाटील, राधिका कुलकर्णी, कोमल देसाई, सुजाता पाटील, संदीप कुंभार, महेश यादव, प्रकाश कालेकर, विद्या बनछोडे, संध्या तेली, राजाराम परिट, दिलीप बोंद्रे, देवेंद्र जोंधळे, गौरव सातपुते, वल्लभ देसाई, ओमकार खराडे, संतोष माळी, विनायक पोळ, शाहरुख गडवाले, प्रीतम यादव, सिद्धांत भेंडवडे, अनिकेत सोलापुरे, वीरेंद्र मोहिते, गिरीष साळोखे, ओंकार कारंडे, अशोक लोहार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!