कोल्हापूर • प्रतिनिधी
बेळगावचे प्रसिध्द चित्रकार किरण हणमशेट यांच्या पोर्ट्रेट पेंटिंगचे प्रात्यक्षिक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. राजारामपुरी येथील सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओतर्फे आयोजन करण्यात आलेल्या या पेंटिंग प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तरुण चित्रकारांना मार्गदर्शन मिळावे आणि चित्रकलेतील बारकावे समजावेत या उद्देशाने प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक रविवारी एका नामवंत चित्रकाराचे प्रात्यक्षिक सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओ येथे आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकाच्यावेळी नामवंत चित्रकरांशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल स्टुडिओचे संचालक सुनील पवार यांनी चित्रकार किरण हणमशेट व उपस्थितांचे आभार मानले व भविष्यात हा उपक्रम सुरू ठेवू आणि त्यास सर्वांकडून असाच प्रतिसाद मिळावा अशी आशा व्यक्त केली.
———————–