• व्हाईस चेअरमनपदी उदय सांगवडेकर
कोल्हापूर • प्रतिनिधी
दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसयटीच्या नियामक मंडळाच्या चेअरमनपदी अरूण डोंगरे यांची तर व्हाईस चेअरमनपदी उदय सांगवडेकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नियामक मंडळाचे माजी चेअरमन मदन कुलकर्णी, सदस्य डॉ. सुनिल कुबेर, मिलिंद करमळकर, कार्यवाह सौ.एस. आर. डिंगणकर, सहकार्यवाह पी. के. गुळवणी, कोषाध्यक्ष जी. एस. जांभळीकर, शिक्षक प्रतिनिधी पी. एम. जोशी हे उपस्थित होते. या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देवून सत्कार करण्यात आला.