कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी परेश भागवत रुजू

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी परेश भागवत हे आज रूजू झाले. यापूर्वी ते मुख्य अभियंता या पदावर प्रकाशगड मुख्यालयात कार्यरत होते. त्यांना विद्युत क्षेत्रात २४ वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
      परेश भागवत हे कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव या गावचे मुळ रहिवासी आहेत. त्यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथून विद्युत आभियांत्रिकी शाखेत पदवी प्राप्त केली आहे. वित्त व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर पदवीचे  शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.
     ते १९९७ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. रत्नागिरी परिमंडळातील कुडाळ विभागामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांनी १९९९ ते २००६ या कालावधीत कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागात सेवा बजाविली आहे. ऑगस्ट २००६ मध्ये सरळ सेवेने त्यांची निवड कार्यकारी अभियंता या पदावर झाली. रत्नागिरी परिमंडळात नवनिर्मित खेड विभागाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. २००७ ते २०११ पर्यंत ते भिवंडी येथील टोरंटो पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचाईजीत सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर ते प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी जानेवारी २०१२ ते जुलै २०२१ या कालावधीत कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता या पदावर महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयात विविध विभागाची जबाबदारी पार पाडली आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!