अष्टमीला अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      आश्विन शुद्ध अष्टमी तिथीला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. नवरात्रातील अष्टमीला देवीचा जागर असतो. आज जागर असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
      दैत्य रंभासुर व महिषी ( म्हैस ) यांच्या मिलनातून महिषासुराचा जन्म झाला होता. तो ब्रम्ह देवाचा भक्त होता व घोर तपश्चर्येतून त्याने ब्रम्हदेवाकडून मानव, देव व दानव यांच्याकडून अपराजित राहण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाने तो उन्मत्त झाला होता व त्र्यैलोक्यावर अधिराज्य मिळवले होते. देवदेवतांना त्याने हैराण करुन सोडले होते व जनतेवर अत्याचार करत होता. त्याला त्रासुन सर्व देवांनी ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्याकडे धाव घेतली. आपली  महिषासुरापासुन सुटका करण्याची विनंती त्यांनी केली. तेव्हा ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रिमुर्तीनी आपल्या क्रोधातुन एक तेज / शक्ति प्रकट केली. ती साक्षात दुर्गा देवीच होती. तिला सर्व देव – देवतांनी आपआपली अस्रे व शस्रे दिली. देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान देऊन दैत्य सेनेबरोबर युद्ध पुकारले. आठ रात्री युद्ध करुन अष्टमीच्या रात्री देवीने महिषासुराचा वध केला. असा आशय असलेली ही श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची महिषासुरमर्दिनी रुपातील पूजा श्रीपूजक सुकृत मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, अरुण मुनिश्वर आणि मयुर मुनिश्वर यांनी बांधली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!