गडकिल्ले स्पर्धेत अष्टविनायक तरूण मंडळांचा ‘तोरणागड’ सर्वोत्कृष्ट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर शहर शिवसेना आणि भवानी फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित गडकिल्ले स्पर्धेमध्ये जाधववाडी येथील अष्टविनायक तरूण मंडळने बनविलेला तोरणागड सर्वोत्कृष्ट ठरला. त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच विजयदुर्ग – टायगर ग्रुप, मंगळवार पेठने व्दितीय क्रमांक तर  प्रतापगड – खंडोबा तालीम, शिवाजी पेठने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत ७८ मंडळांनी सहभाग घेतला.
     स्पर्धेत सहभागी झालेल्या मंडळांनी तोरणा गड, प्रतापगड, विजयदुर्ग, शिवनेरी, राजगड, राजमाची, रसाळगड, सुमारगड, महिपतगड, पन्हाळा, पद्मदुर्ग, कुळाबा,  सुवर्णदुर्ग आदी विविध प्रकारच्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या होत्या.
      राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी किल्ले बांधणीमध्ये सहभागी असलेल्या युवतींना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील सहभागी मंडळांना सर्टिफिकेट आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्याच्या सेन्सॉर बोर्डावर निवड झाल्याबद्दल किरणसिंह चव्हाण यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
     याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, अमित आडसुळे, सुरज ढोली, अंकुश निपाणीकर, प्रदीप पांडे, चैतन्य अष्टेकर, शुभम जाधव, अमृता सावेकर, प्रिया पाटील, संकेत खोत, कृष्णा जगताप, सुचित पोतदार, युवराज हळदीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!