अश्वमेध स्पोर्ट्सची विजयी सलामी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     फायटर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित कै.प्रा. संजय देसाई स्मृती चषक ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत अश्वमेध स्पोर्ट्स संघाने फायटर्स स्पोर्ट्स क्लब (बी) संघावर ४ गडी राखून मात करत विजयी सलामी दिली.
     शाहूपुरी जिमखाना मैदानावर सोमवारी सकाळी कै.प्रा.संजय देसाई स्मृती चषक स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अविनाश चिकणीस यांच्या अध्यक्षतेखाली व सिद्धिविनायक ग्रुपचे डॉ. संजय देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. महादेव नरके, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी केदार गयावळ, नंदकुमार बामणे, दिवाकर पाटील, चेतन पाटील, राजू पठाण व उमेश माने आदी उपस्थित होते.
     प्रथम फलंदाजी करताना फायटर्स स्पोर्ट्स क्लबने २० षटकात सर्वबाद १४५ धावा केल्या. त्यांच्या पारितोष वराडकर ३४, विनायक हबीब ३०, सागर तारळेकर २२ राजू चाळके १८ धावा केल्या. फायटर्स स्पोर्ट्स क्लबच्या अमोल पाटील व आशुतोष अंबपकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर श्रीश पाटील, संदीप मुसळे व अविनाश दबडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.
      प्रत्युत्तरादाखल खेळताना अश्वमेध स्पोर्ट्सने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. त्यांच्या विशाल वरपेने ४५, संदीप मुझसे २७, अमोल पाटील २२ व अविनाश दबडेने २० धावा केल्या. फायटर्स स्पोर्ट्स क्लबकडून शुभ्यंकर माने याने २ बळी घेतले तर तुषार असोले, धनंजय सोनुले,  तन्वीर सय्यद यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!