कोल्हापूर • प्रतिनिधी
अस्सल नाणं कोल्हापूरी अंतर्गत एकपात्री अभिनय व सोलो नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून हा कोल्हापूरच्या कलाकारांसाठी अभिनव उपक्रम असल्याचे मत डॉ. शरद भुताडीया यांनी व्यक्त केले. तसेच या स्पर्धेचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांनी घ्यावा असे मत संजय मोहिते यांनी व्यक्त केले. यावेळी अजित साबळे, विनय निल्ले उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मौजे खानापूरचे असलेले पण लहानपणापासून मुंबईत स्थाईक असलेले लेखक – दिग्दर्शक अजित मारुती साबळे यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील जिद्दी व हुशार कलाकारांसाठी चित्रपटसृष्टीत व्यासपीठ मिळाव म्हणून “अस्सल नाणं कोल्हापूरी” या शोची निर्मित केली असून शो मधून प्रत्येक तालुक्यातून तीन उत्कृष्ट डान्सर, तीन उत्कृष्ट कलाकार निवडले जाणार आहेत. त्यांची अंतिम फेरी जिल्हा स्तरावर होईल. तसेच ध्वज क्रिएशन या संस्थेमार्फत पुढील (Film/ serial/ song/ Ad) प्रोजेक्टसाठी त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे अजित साबळे यांनी सांगितले.
स्पर्धा २१ ते २४ मे २०२२ होईल तर अंतिम स्पर्धा २९ मे रोजी जिल्हास्तरावर होईल. स्पर्धकांनी “अस्सल नाणं कोल्हापूरी” या शो मध्ये येण्यासाठी पुढील ठिकाणी २१ मे रोजी राधानगरी, भुदरगड (गारगोटी), कागल (मुरगुड), २२ मे- करवीर(कोल्हापूर), शिरोळ, हातकणंगले (इचलकरंजी), २३ मे – आजरा, गडहिंग्लज, चंदगड येथे तसेच २४ मे रोजी पन्हाळा (कळे), शाहूवाडी, (मलकापूर), गगनबावडा (तिसंगी) येथे उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी ०७५०६२०२१२६ आणि ०२३१- २५२४३११ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.