मंडलिक फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोल्हापूर शहरातील विविध परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर निवारा केंद्रात करण्यात आले आहे. अशा स्थलांतरीत झालेल्या सुमारे ५५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने लोकनेते सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, ॲग्रीकल्चरल, एज्युकेशन अँन्ड कल्चरल डेव्लहपमेंट रिसर्च फौंडेशन व अयोध्या फाऊंडेशनच्या यांच्या सामाजिक बांधीलकीतून या पूरग्रस्त लोकांना सुविधा देण्याचा उपक्रम आजपासून सुरू केला असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
     कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे महापूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून प्रशासनाने वेळीच नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. कोल्हापूर शहरात विविध भागात महापुराचे पाणी घुसल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना रोजचे जेवण, चहा, नाष्टा याची सोय व्हावी याकरीता एसडीएम फौंडेशन व अयोध्या फौंडेशन यांनी स्टेशन रोडवरील अयोध्या डेव्हलपर्सच्या इमारतीमध्ये सेंट्रल किचन सुरु केले असून याठिकाणाहून दररोज डॉ. आंबेडकर विद्यालय – सिध्दार्थनगर, छत्रपती शाहू हायस्कूल, के.एम.सी. कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय – उत्तरेश्वर पेठ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ – उत्तरेश्वर पेठ, श्रमिक हॅाल – लक्ष्मीपुरी, चित्रदुर्ग मठ, लोणार शाळा, लोणार माळ – जकात नाका येथील स्थलांतरीत पूरग्रस्तांकरीता जेवण, नाष्टा व चहा पाठविला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती बिकट झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन सोडून खासदार संजय मंडलिक आज कोल्हापूरात परतले. 
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!