कोल्हापूर • प्रतिनिधी
मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे वि.स. खांडेकर यांचा ४५ वा स्मृतिदिन आज शिवाजी विद्यापीठातील वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे भावपूर्ण वातावरणात झाला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते वि.स.खांडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.