औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकाऱ्यांची केडीसीला अभ्यास भेट

Spread the love


      
• गांधीगिरीने राबविलेल्या वसुली पद्धतीचेही  केले विशेष कौतुक
कोल्हापूर • प्रतिनिधी
      औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षासह संचालक मंडळ व अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सीबीएस प्रणाली, अनिष्ट तफावत, कर्जवाटप या विषयांवर सविस्तर माहिती घेतली. केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
       याबाबत अधिक माहिती अशी, बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गाढे, संचालक मंडळातील सदस्य व माजी आमदार अण्णासाहेब माने, डॉ. सतीश गायकवाड, डॉ. मनोज राठोड, कन्नड बाजार समितीचे संचालक पांडुरंग घुगे, कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख दत्ता गुजेला, माहिती तंत्रज्ञान सल्लागार कल्याण पाटील आदी प्रमुखांसह हे अधिकारीही उपस्थित होते.
       या शिष्टमंडळाने केंद्र कार्यालयाकडून होणारे शाखांच्या कामकाजांचे नियंत्रण, बँकेकडून साखर कारखानदारीला होणारा कर्जपुरवठा, मोबाईल बँकिंग, आर्थिक साक्षरता आदी विषयांबाबत सविस्तर माहिती घेतली. बँकेने अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत राबविलेल्या सीबीएस प्रणालीचेही या पाहुण्यांनी विशेष कौतुक केले.
       यावेळी केडीसीसीच्या ज्येष्ठ संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, संचालिका सौ. स्मिता गवळी, संचालिका सौ. श्रुतीका काटकर, संचालक भैय्या माने, संचालक सुधीर देसाई, आयटी विभाग व्यवस्थापक गोरख शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
              कौतुक गांधीगिरीच्या वसुलीचे…..
      अभ्यास भेटीसाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने बँक कामकाजाची माहिती देत होते.  सहा वर्षापूर्वी प्रशासक जाऊन संचालक सत्तेवर आले, त्यावेळी १३७ कोटी रुपयांचा संचित तोटा असल्याचे ते सांगत होते. त्यानंतर ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली थकबाकीदारांच्या दारात 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!