ऑटोरिक्षा परवाना धारकांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पालकमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

x
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आजअखेर जिल्ह्यातील पावणेचार हजार चालकांच्या खात्यावर प्रत्येकी दीड हजार अनुदान जमा झाले असून ज्या रिक्षाधारकांनी अद्याप यासाठी अर्ज केले नसतील त्यांनी तात्काळ यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.
     याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना दीड हजार रुपयांचे  सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे . त्यासाठी जिल्ह्यात असे अर्ज भरण्यासाठी शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १५,२८७ पैकी फक्त ८,१४० रिक्षाचालकांनी  ऑनलाईन अर्ज केले आहेत. ६,११७ अर्जावर कार्यवाही पूर्ण होऊन ३,७४६ रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. 
     ज्यानी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी त्वरित अर्ज करावा व योजनेचा लाभ घ्यावा. ज्यांचे मोबाईल व बँक खाते आधार लिंक नाही अशा परवानाधारकांनी त्वरित नजीकच्या पोस्ट विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही ना. पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!