कोल्हापूर • प्रतिनिधी
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा १७ वर्षाखालील मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथे झाल्या. या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशनचे पंच अवधूत गायकवाड यांची सामना निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी सामना निरीक्षक म्हणून उत्कृष्टपणे कामकाज पाहिले.
अवधूत गायकवाड यांना केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच केएसए सचिव माणिक मंडलिक व सहाय्यक सचिव राजेंद्र दळवी आणि कोल्हापूर रेफ्री असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव व सचिव प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-