कोल्हापूर • प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून गरुडझेप घेतली व राजगडावर परत आले. त्यास ३५५ वर्ष होत आहेत. यानिमित्य गरुडझेप मोहिमेचे आयोजन मारुती बाबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. मोहिमेदरम्यान हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे शिलेदार व शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे अध्यक्ष सुरज ढोली हे विविध ठिकाणी शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देत आहेत. आग्रा ते राजगड या शिवस्मरण मार्गावर शिवज्योत घेऊन धावताना येणारी मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यांतील शहरे येथील मराठी समाज, शिवप्रेमी व शिवभक्त तरुण-तरुणी यांना शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळ या विषयी माहिती व्हावी व आपल्या पूर्वजांची परंपरा जपून आजचा युवक बलशाली बलवान बनावा यासाठी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला व विटा फेक फरीगदगा, तलवारफेक इत्यादी शस्त्रविद्या अवगत व्हावी व मुलींना स्वतःचे रक्षण करता यावे हा उद्देश समोर ठेवून प्रात्यक्षिके करून प्रशिक्षण दिले. मर्दानी खेळाचा प्रसार व प्रचार याकरिता आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुणा, पचोरा, देवास, इंदोर या विविध शहरात सुरज ढोली यांनी प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देत आहेत. त्याचबरोबर गड भटकंती दुर्गसंवर्धन वडगाव मावळचे गणेश जाधव, अंकेश ढोरे, चैतन्य बोडके, विनायक धारवाडकर आणि सहकारी या शिवकार्यात मदत करत आहेत. यासाठी सुरज ढोली यांना हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, विनोद कांबोज, बंडा साळोखे, जयदीप जाधव व युवराज पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले आहे. या मोहिमेमध्ये सामाजिक उपक्रम, सामाजिक संदेश, वृक्षारोपण व इतिहासाविषयी लोकांमध्ये जनजागृती करून ही गरुडझेप मोहिम शिवस्मरण मार्गावरून मार्गक्रमण करत आहे. आत्तापर्यंत गरुडझेप मोहिमेमध्ये ८८० किलोमीटरचा टप्पा पार करून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गरूडझेप मोहिमेतील शिवज्योत राजगडावर पोहोचल्यानंतर राजगडावरून सातारा-कराड मार्गे कोल्हापूरमध्ये शिवज्योत आणण्यात येणार आहे. ही मोहिम पुणे, वडगाव, मावळ, कोंढवे, धावडे, कोल्हापूर, धुळे, मुळशी, अहमदनगर, बुलढाणा येथील युवकांबरोबर वडगाव मावळ दुर्गसंवर्धन संस्था, शिवभूमी दूर्गभ्रमंती कोंढवे धावडे, नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच कोल्हापूर यातील शिलेदार सामील झाले आहेत. ——————————————————- Attachments areaReplyForward