राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार ललित गांधी यांना प्रदान

Spread the love

• केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
कोल्हापूर • प्रतिनिधी
       भारतातील आठ कोटी व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या संस्थेचा राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे  अध्यक्ष ललित गांधी यांना प्रदान करण्यात आला.
       कॉन्फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकप्रसंगी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, सौ. जया गांधी, कु. मुक्ति गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.
       व्यापारी, उद्योजकांची संघटनात्मक बांधणी, व्यापारी उद्योजकांच्या संरक्षणासाठी व न्याय हक्कासाठी विविध लढ्यांचे व आंदोलनाचे केलेले यशस्वी नेतृत्व, स्थानिक पातळीपासून राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत व्यापार्‍यांच्या प्रश्‍नांसाठी केलेला संघर्ष व पाठपुरावा या क्षेत्रातील गेल्या ३५ वर्षातील केलेले उल्लेखनीय कार्य, विशेषतः कोरोना काळात लॉकडाउनमधील व्यापार्‍यांच्या हक्कासाठी दिलेला आक्रमक लढा याची दखल घेउन ललित गांधी यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी नमुद केले.    
      या समारंभाप्रसंगी कॅटचे राष्ट्रीय चेअरमन महेंद्र शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष बृजमोहन अगरवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, कॅटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, कार्याध्यक्ष दिलीप कुंभोजकर, सचिन निवंगुणे यांच्यासह देशभरातील सर्व राज्यांचे प्रमुख व व्यापारी नेते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!