विनायक भोसले यांना ऑऊटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन पुरस्कार प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना नवभारत मीडियाकडून ”ऑऊटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन ” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. विश्वस्त विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
      विनायक भोसले यांनी विश्वस्त म्हणून १२ वर्षाच्या कालावधीत आपल्या तत्पर, जबाबदार, स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी विश्वस्त म्हणून सन २०१० पासून संजय घोडावत इन्स्टिटयूटचा कार्यभार स्वीकारला. सुरुवातीस अभियांत्रिकी व मॅनेजमेंट या शाखा स्थापित झाल्या व त्यानंतर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल, पॉलीटेक्निक, ज्युनिअर कॉलेज, आयआयटी व मेडिकल अकॅडमी, ऑलिम्पियाड स्कुल, इन्स्टिटयूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस अशा स्वतंत्र शाखा सुरु झाल्या. २०१७ साली संजय घोडावत विद्यापीठ स्थापन झाले. यासोबतच आयटीआय, रेसीडेंशल अकॅडमी सुरु करण्यात आल्या. ३०० विद्यार्थ्यांवर सुरु झालेली ही संस्था व आज याठिकाणी १६००० हुन जास्त विद्यार्थी आपले भविष्य घडवीत आहेत. संजय घोडावत इन्स्टिटयूट ते संजय घोडावत विद्यापीठ या प्रवासापाठीमागे विश्वस्त म्हणून विनायक भोसले यांनी दिलेले योगदान खरोखर गौरवास्पद आहे.
      विनायक भोसले यांना या आधी २०१५ साली अविष्कार फौंडेशनतर्फे ”उत्कृष्ट प्रशासक” म्हणून गौरविण्यात आले आहे. २०१७ साली त्यांना सी न्यूज तर्फे शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल ”उत्कृष्ट कार्यगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर २०१८ साली संजय घोडावत ग्रुप तर्फे त्यांना ”एज्युकेशन एक्सलन्स” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच २०१९ साली महाराष्ट्र पत्रकार संघाकडून राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
     संजय घोडावत विद्यापीठाची अल्पावधीतच झालेली नेत्रदीपक प्रगती,  तसेच इन्स्टिटयूटला नॅक कडून ‘ अ’ हा दर्जा, एनबीए मानांकन, आयएसओ मानांकन व विविध पुरस्कार यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे. काही वर्षातच त्यांनी आदर्श प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
      विनायक भोसले यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.एन.के.पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!