प्रा.गफूरसो मकानदार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत पॉलीटेक्निकचे गणित विषयाचे प्रा.गफूरसो अशरफ मकानदार यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था, इचलकरंजी या संस्थेतर्फे २०२१ या वर्षाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     प्रा.गफूरसो मकानदार यांनी स्वतः हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे वितरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या यशाबद्दल घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रा.मकानदार यांना गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी शैक्षणिक सल्लागार डॉ. बी. एम. हिर्डेकर व प्राचार्य विराट गिरी उपस्थित होते.
      प्रा.गफूरसो मकानदार यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रा.मकानदार हे मूळचे गडहिंग्लजचे आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथे झाले. पुढे त्यांनी राजाराम महाविद्यालय कोल्हापूर येथून गणित विषयातून पदवी संपादन केली. यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. याचबरोबर त्यांनी आयएसटीईने घेतलेल्या रामानुजन या प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात ६ वा क्रमांक पटकाविला आहे.
     या यशाबद्दल घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!