भारती विद्यापीठाचे प्राचार्य डॉ.कणसे यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांना प्रतिष्ठा फौंडेशनकडून  ”राज्यस्तरीय शिक्षणरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण साखर आयुक्त शेखर गायकवाड व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
     शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.कणसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या रूपाने भारती विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीतील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
     डॉ. डी.जी. कणसे यांनी पदवी व पदव्युत्तर स्तरावर ३३ वर्षे अध्यापन कार्य करीत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्राचार्य पदावर गेली १५ वर्षे कार्यरत आहे. त्यांना या आधी शिवाजी विद्यापीठाचा प्रतिष्ठित मानला जाणारा ”गुणवंत प्राचार्य” पुरस्कार प्राप्त झाला आहे. विकासाभिमुख शिस्तप्रिय,उत्तम प्रशासक, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये त्यांची ख्याती आहे.
     डॉ.कणसे सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सांगली जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या गव्हर्निग बॉडी शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी, फर्ग्युसन कॉलेज पुणे रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आपल्या कर्तृत्वशक्तीने मोहोर उमटविली आहे. डॉ. डी.जी. कणसे यांनी शिवाजी विद्यापीठ व भारती विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या प्रशासकीय समितीत कार्य केले आहे. नॅक, शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालयाने भरीव कामगिरी केली आहे.
     पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारती विद्यापीठ प्र-कुलगुरू, कार्यवाह व राज्यमंत्री डॉ.विश्‍वजित कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम, कुलगुरु डाॅ. माणिकराव साळुंखे, विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.  

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!