कोल्हापूर • प्रतिनिधी
डी.आय.डी.फौंडेशन व डी.आय.डी. गार्गीज क्लबचे संस्थापक अध्यक्ष मॅडी तामगावकर यांना एल्फस स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी दिल्लीची डॉक्टरेट पदवी एल्फस स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी दिल्लीचे कुलगुरु डॉ.अंजु भंडारी यांच्या हस्ते रजिस्ट्रार डॉ.के.डी.आर्या, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह कळंबाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर, राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष गोवा दीव दमण अजित देसाई, मिस्टर एशिया डॉ. विशाल कांबळे, आय. एफ. एफ. बी. प्रो. जानवी पांडव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
मॅडी तामगावकर यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी डी. आय. डी. फौंडेशनची स्थापना केली. आपला व्याप सांभाळत २०१३ साली ते समाजकारणात सक्रिय झाले. आतापर्यत ५०० हुन अधिक गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली असून त्यांनी तृतीयपंथी, दिव्याग, मतिमंद, अंध, कर्णबधिर, मूकबधिर, वारांगना यांना अनेकवेळा वेगवेगळी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून समाजात त्यांना मानसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत.