प्रा.अजय कोंगे यांना ”राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय कोंगे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्याकडून ”राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबद्दल विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. हा पुरस्कार म्हणजे संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या यशस्वी वाटचालीतील शिरपेचात मानाचा तुरा म्हणावा लागेल.
     प्रा.अजय कोंगे यांनी शैक्षणिक, सामाजिक, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
     प्रा.कोंगे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी गावचे असून सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड आहे. मग ते गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करणे, गरजूला, समाजातील उपेक्षित घटकांना मदत इत्यादी कामे त्यांच्या सामाजिक कार्याचा संदेश देतात. त्यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींना विविध राज्य व केंद्र सरकारच्या लोकपयोगी कौशल्य विकास व उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन  नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. ते एक करिअर समुपदेशक असून त्यांनी समुपदेशित केलेली हजारो विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
     प्रा.कोंगे यांचे शिक्षण एम.ए.एम.एड असून त्यांनी अध्यापक विद्यालयात १५ वर्षे अध्यापन केले आहे. त्यांनी उत्तम दर्जाचे शिक्षक तयार केले आहेत. कौशल्य व उद्योजकता विभागामार्फत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करून काहींना उद्योजक बनविले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या आधीही महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतर्फे ” सोशल मीडिया महामित्र” या विधायक कार्याबद्दल गौरव करण्यात आले होते. तसेच विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्याकडून “राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
     या पुरस्काराबद्दल प्रा.कोंगे म्हणाले की, पुरस्कार नेहमी व्यक्तीला चालना देतात. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात मला मदत केलेल्या सर्व घटकांचा हा पुरस्कार आहे असे मी मानतो. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून भविष्यात तळागाळातील सुशिक्षत बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्य विकसित करू.
     या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!