संजय घोडावत विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ डिझाईन अभ्यासक्रम सुरु

Spread the love

संजय घोडावत विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ डिझाईन अभ्यासक्रम सुरु
कोल्हापूर • प्रतिनिधी
      अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ डिझाईन अँड आर्किटेक्चर अंतर्गत बॅचलर ऑफ डिझाईन हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून सुरू करण्यात आला आहे.
      या अभ्यासक्रमाअंतर्गत स्पेस (इंटेरियर) डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, ग्राफिक डिझाईन व फॅशन डिझाईन हे चार विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केले आहे.
       विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. अरूण पाटील म्हणाले, सदर अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असून विद्यार्थ्यांच्या अंगिभूत कला गुणांचे व्यवसायात रूपांतर करून देणारी ही विद्याशाखा आहे. या अभ्यासक्रमाची शिक्षण पद्धती ही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर आधारित असून २०% थेअरी व ८०% प्रात्यक्षिक अशा स्वरूपाची आहे. या पदवीचा अभ्यासक्रम हा डिझाईन क्षेत्रातील नामवंत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. मार्गदर्शन करणारे शिक्षक हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी आहेत. प्रात्यक्षिकांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्टुडिओ उपलब्ध आहे. विविध डिझाईनची प्रात्यक्षिके, वर्कशॉप, स्टुडिओ व प्रोजेक्ट या माध्यमातून केली जातात.
       या अभ्यासक्रमाअंतर्गत नॅशनल व इंटरनॅशनल इंटरशिप करणे अंतर्भूत आहे.
संजय घोडावत विद्यापीठाची अल्पावधीतच देशभर ख्याती झाली आहे. तसेच विद्यापीठाने विविध शैक्षणिक संस्था व इंडस्ट्रीज यांचे बरोबर शैक्षणिक करार केले आहेत. या अंतर्गत टीसाईड युनिव्हर्सिटी युके व ऑकलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूझिलँड यांचे बरोबर शैक्षणिक करार केलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंटकरीता विद्यापीठाकडून मार्गदर्शन व सहाय्य केले जाते अशी माहिती विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.
      या नव्याने सुरु केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अध्यक्ष संजय घोडावत यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
       यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ. यु.पी.जाधव, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन डॉ. ए. डी. सावंत, संचालक डॉ व्ही. व्ही. कुलकर्णी, विभाग प्रमुख सौ. तोरस्कर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!