खाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव • पुण्यात खाशाबा जाधव यांची ९६ वी जयंती साजरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी  धृवतारा फाऊंडेशनच्यावतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची ९६ वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना दुसरा खाशाबा जाधव पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.
      १५ जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हनुमान कुस्ती आखाडाच्या सभागृहात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जयंतीचा विशेष समारंभ साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  मानचिन्ह, पुस्तके, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 
      याप्रसंगी हनुमान कुस्ती आखाडाचे प्रशिक्षक गणेश दांगट, धृवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष व क्रीडालेखक संजय दुधाणे, गोरख वांजळे, विनोद माझिरे, गणेश घुले, कुस्ती प्रशिक्षक रामसिंग, उमेश कांबळे आदी उपस्थित होते. यापूर्वी पहिला पुरस्कार ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांना देण्यात आला होता.
      देशाचे पहिले ऑलिम्पिदक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खाशाबांनी जिंकलेल्या पदकाची कथा त्यांनी उपस्थित कुस्तीगीरांना सांगितली. खाशाबांचे पदक हे आजही महाराष्ट्राचे एकमेव ऑलिम्पिक पदक आहे. देशासाठी खेळताना खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पदक आजही प्रेरणादायी आहे. त्यांची जयंती शासनाच्या क्रीडा खात्याने, कुस्ती परिषदेने साजरी केली पाहिजे.
     यावेळी गणेश दांगट व राजेंद्र बांदल यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!