बालगोपाल आणि पाडळी संघाची उपांत्य फेरीत धडक


कोल्हापूर • प्रतिनिधी
      स्व. डी. सी. नरके चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.१९) बालगोपाल तालीम मंडळ आणि हनुमान पाडळी एफसी संघामध्ये  उपांत्य फेरीची लढत होईल. 
     स्व. डी. सी. नरके  चषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या दिवसभरातील सामन्यात प्रतिस्पर्धी संघांवर मात करून बालगोपाल तालीम आणि हनुमान पाडळी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
      बुधवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीमने बावडा एफसीवर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. बालगोपालकडून ऋषीकेश मेथे-पाटील व अभिनव साळोखे यांनी प्रत्येकी २ गोल केले.
       ए जी बॉईज एफसीने खंडोबा तालीमवर टायब्रेकरवर ३-२ ने विजय मिळवला. बीजीएम स्पोर्ट्स आणि फुलेवाडी यांच्यातील सामन्यात फुलेवाडीने  टायब्रेकरवर ४-३ ने मात केली. 
       ऋषीकेश मेथे-पाटीलने केलेल्या एकमेव गोलवर बालगोपालने झुंझार क्लबवर विजय मिळवला. उत्तरेश्वर वाघाची तालीमने ए जी बॉईजवर ५-१ गोलने विजय मिळवला. वाघाची तालीमकडून तुषार पुनाळकरने २ गोल तर अक्षय शिंदे , प्रकाश संकपाळ व  आकाश मोरे यांनी प्रत्येकी एक गोल केले. वेताळ तालीमने श्रीराम एफसीवर
एकमेव गोलने मात केली.
      पाडळी संघाने  कोडोलीवर एकने विजय मिळवला. बालगोपाल तालीमने  वेताळ तालीमवर एक गोलने मात केली. त्यांच्या ऋषीकेश मेथे-पाटीलने विजयी गोल नोंदविला.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *