डी.सी.नरके फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल अजिंक्य; पाडळी उपविजेता

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      पूर्वार्धात घेतलेली २-० गोलची आघाडी पूर्णवेळेत कायम राखत बालगोपाल तालीम मंडळने जय हनुमान फुटबॉल क्लब पाडळी संघावर मात करून डी.सी. नरके चषक फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. पाडळी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बालगोपालच्या रोहित कुरणे व ऋतुराज पाटील यांनी गोल केले.
     सांगरूळ फुटबॉल क्लब आयोजित स्व. डी. सी. नरके राज्यस्तरीय खुल्या फुटबॉल स्पर्धेला रविवारी (दि.१४) प्रारंभ झाला. कुडित्रे (ता. करवीर) येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर स्पर्धेतील सामने चुरशीने खेळले गेले. शुक्रवारी (दि.१९) बालगोपाल आणि हनुमान पाडळी संघात विजेतेपदासाठी लढत झाली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने जोरदार चढाया झाल्या.
       पूर्वार्धात ऋषिकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर रोहित कुरणेने हेडव्दारा गोल नोंदवून बालगोपालला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ऋतुराज पाटीलने डाव्या बाजूने मारलेल्या थेट फटक्यावर चेंडू गोलजाळ्यात शिरला आणि दुसऱ्या गोलची आघाडी मिळाली. गोलची परतफेड करण्यासाठी पाडळी संघाच्या योगेश कदम, चेतन आडनाईक, इंद्रजीत चौगुले यांनी खोलवर चढाया केल्या परंतु त्यांना गोल करण्यात यश आले नाही. 
      उत्तर्धात दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. बालगोपालकडून ऋषिकेश मेथे-पाटील, रोहित कुरणे, सूरज जाधव यांनी रचलेल्या चाली अयशस्वी ठरल्या. पाडळी संघाकडून योगेश कदम, रोहन आडनाईक, इंद्रजीत चौगुले, चेतन आडनाईक यांनी गोलची परतफेड करण्यासाठी खूप प्रयत्न केले. बालगोपालचा गोलरक्षक अक्षय कुरणे आणि बचावफळीतील अक्षय मेथे-पाटील, दिग्विजय वाडेकर, ऋतुराज पाटील यांनी त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. अखेर पूर्णवेळेत २-० गोलची आघाडी कायम राखत बालगोपालने सामना जिंकून  विजेतेपदाला गवसणी घातली.
      स्पर्धेतील विजेत्या बालगोपाल संघास २१ हजार रुपये तर उपविजेत्या हनुमान पाडळी संघास १५ हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात आला. फुलेवाडी फुटबॉल संघ तृतीय तर सांगरूळ फुटबॉल क्लब चतुर्थ, साई गिजवणे पाचव्या आणि कोडोली संघ सहाव्या स्थानावर राहिला. 
     कुंभी-कासारी सह. साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके आणि कुंभी बॅंकचे चेअरमन अजित नरके यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी देवराज नरके, राजवीर नरके, संभाजी नाळे, संदीप शेलार, निवास वातकर, अजित पाटील, संजय पाटील, सुधीर खाडे, दादासो लाड, सुशांत नाळे, प्रकाश दौ. पाटील, सरदार खाडे, प्रकाश पाटील (पीडी), बाजीराव वातकर, अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

You just need to make sure that the product you pick is reliable and safe enough. You definitely do not want to compromise your safety over short-term benefits that may even bring potential risks and side effects. However, you also need to consider other essential factors. levitra malaysia The effect is said to last for up to seven days.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!