कोल्हापूर • प्रतिनिधी
हॉटेल सयाजी कोल्हापूर येथील बार्बेक्यू नेशन वैशिष्ट्यपूर्ण सी फूड फेस्टिवल ‘ओशियन्स बाऊण्टी’ आयोजित केला आहे. विविध स्वाद व पाककला कोल्हापूरमधील खवय्यांच्या चवींची पूर्तता करण्यास सज्ज आहेत. बार्बेक्यू नेशन, सयाजी हॉटेल येथे सायंकाळी ७ वाजल्यापासून दि.१३ ते २३ जानेवारी २०२२ असा ११ दिवसीय फेस्टिवल आहे.
यामध्ये सर्वोत्तम पाककलांसह विविध प्रकारच्या सीफूड पाककला व स्टार्टर्सचा आस्वाद मिळणार आहे. नयनरम्य बीच ॲण्ड सीशोअर थीम गंतव्याला अधिक सुशोभित करेल, तर रेस्टॉरण्टमधील कर्मचारी खास युनिफॉर्म्स परिधान केलेल्या पेहरावामध्ये दिसतील.
मेनूमध्ये चविष्ट सीफूड, शेलफिश व स्थानिक पाककलांचा समावेश आहे. मेहनतीने तयार करण्यात आलेल्या बुफे स्प्रेडमध्ये विविध प्रकारच्या सी फूड स्पेशालिटीज आहेत- जसे किंग फिश, पॉमफ्रेट, लॉबस्टर, काटला, शार्क, स्क्विड आणि ऑक्टोपस. मास्टर शेफने कोल्हापूरमधील सी फूड प्रेमींची चव व आवड लक्षात घेत अस्सल मेनू तयार केले आहेत.
बार्बेक्यू नेशन देशातील अग्रणी बार्बेक्यू रेस्टॉरण्ट्सपैकी एक आहे. भारतातील आघाडीची कॅज्युअल डायनिंग शृंखला बार्बेक्यू नेशनने डायनिंग टेबल्सवर ‘ओव्हर दि टेबल बार्बेक्यू’ लाइव्ह ग्रिल्स संकल्पना आणली आणि अतिथींना टेबल्सवर स्वत:च्या आवडीच्या बार्बेक्यूचा आस्वाद दिला.
कोल्हापूरमधील सी फूड प्रेमींनी भेट द्या: www.sayajihotels.com
——————————————————-