नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वसुबारसनिमित्त गोमातेची पूजा

Spread the love
Attachments


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरून दिल्यामुळे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती मला गोमातेने द्यावी, अशी प्रार्थना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
      करनूर (ता.कागल) येथील शिंदे मळ्यामध्ये वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाली. यावेळी ते म्हणाले, गेली ४० वर्ष अव्याहतपणे सामाजिक जीवनात कार्यरत आहे. या काळात सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली,  त्यापैकी या जनतेने मला सलग पाचवेळा  निवडून दिले. त्यामुळेच मला पंचवीस वर्षे आमदार व त्यापैकी १६  वर्ष मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जनतेची हे ऋण  या जन्मीच काय, तर सात जन्मातही फेडू शकत नाही.
       जनतेचा हा पांग फेडण्याच्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच निराधारांची सेवा,  विकासकामे, बांधकाम कामगारांचे शहर राज्यातील कामगारांचे कल्याण, आरोग्यसेवेच्या माध्यमातून मी माझे आयुष्य खर्ची घातले आहे. उर्वरित आयुष्य ही त्याच कृतज्ञतेच्या भावनेने कार्यरत राहू.
       नवे विकास पर्व आणणार…..
     नाम.मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंतच्या वाटचालीत विकास कामांसह विशेषतः निराधारांची सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून केलेली आरोग्यसेवा, बांधकाम कामगारांसह कामगारांचे कल्याण, जनतेच्या अडीअडचणी व समस्यांचा निपटारा या गोष्टीमध्ये अत्यंत तळमळीने काम केले. ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदारसंघात नवे विकासपर्व आणणार, असेही ते म्हणाले.
    स्वागत प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास महम्मद शेख, रावसाहेब चौगुले,  इम्रान नायकवडी,  वजिर नायकवडी, समीर शेख, सदाशिव पाटील, रंगराव पाटील, अण्णासो पाटील, अशोक कांबळे ,तानाजी शिंदे, कृष्णात चव्हाण, धनाजी शिंदे, दयानंद शिंदे, मयूर शिंदे ,महादेव शिंदे ,विष्णु शिंदे, कुमार पाटील, अरुण जाधव आदी उपस्थित होते. शेवटी आभार तातोबा चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!