कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून सज्ज राहूया: नाम. हसन मुश्रीफ कोल्हापूर

Spread the love

प्रतिनिधी
     कोरोनाची दुसरी लाट येईल असे गृहीत धरून आपण सर्वजण सज्ज राहूया, अशा सूचना ग्रामविकास अधिकारी हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोरोनायोद्धे म्हणून लढणाऱ्या सर्व पातळ्यांवरील अधिकाऱ्यांना नाम. मुश्रीफ यांनी पत्र लिहून लढण्यासाठी पाठबळ देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
     पत्रात पुढे म्हटले आहे, सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मला आढावा बैठक घेवून तुम्हा सर्वांना सूचना देता येणार नाहीत. त्यामुळे माझ्या भावना मी या पत्रातून मांडत आहे. आचारसहिता संपताच आपण सर्वजण मिळून पुन्हा नियोजनबद्धरित्या जोमाने काम करूया.
     अलीकडचे काही दिवस कोरोना महामारीचे संकट कमी झालेले असून बाधितांची संख्याही रोडावलेली आहे. ही बाब निश्चितच सुखावह आहे. परंतु युरोपीय राष्ट्रामध्ये, अमेरिकेमध्ये तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनावर औषध येईपर्यंत आपण सर्वानी खबरदारी घेतलीच पाहिजे. आपण पुन्हा या विषाणू बरोबरच्या युद्धाला सज्ज राहीले पाहिजे. गाफील राहू नका. टेस्टिंग वाढवा, कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये ढिलाई करू नका.
     आचारसंहितेमुळे मला कोरोना आढावा बैठक घेथून तुम्हास सूचना देता येणार नाहीत. परंतु आचारसंहितेनंतर पुन्हा आपण बघूच. तालुक्यामध्ये फक्त १२ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तेही होम अॅडमिट आहेत. कोविड केअर सेंटर सर्व ठिकाणी आहेत. तालुका कोरोना मुक्तीसाठी तुमचे अभिनंदन. परंतु दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहून कोरोना पूर्णपणे गाडून टाकूया!
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!