पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून सावधानता बाळगावी: महावितरणचे आवाहन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     मकरसंक्राती सण म्हणजे तीळ-गुळाचा गोडवा अन् निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे रंगीबेरंगी पतंग..! बालकांसह जेष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा वीजेचे खांब, वीज वितरण रोहित्रे, वीज वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. तेंव्हा पतंगप्रेमींनी पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
     शहरी व ग्रामीण भागात विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. पतंगप्रेमींनी मोकळ्या मैदानात पतंग उडवावा. वीज वाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. त्यामुळे वीज वाहिन्यांचे एकमेंकावर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्त हानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, रोहित्रांवर चढून वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा. वीज वाहिन्यांवर अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वीज वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. धातुमिश्रीत मांजा वीज यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात विद्युत प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.
     आपातकालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी वा महावितरणच्या २४x७ ग्राहक सुविधा केंद्राच्या १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!