कोल्हापूर • प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवार माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास केडीसीसी बँकेचे संचालक व शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केला.
आज पुणे येथे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, सिनेट सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मला देऊन आमचे नेते शरद पवार माझ्या निष्ठेला निश्चितच न्याय देतील, असा विश्वास यावेळी प्रताप उर्फ भैय्या माने यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, जि.प.सदस्य युवराज पाटील, जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश सरचिटणीस आदिल फरास,राजेश लाटकर, सरचिटणीस अनिल साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर जिल्हा अध्यक्ष अनिल घाटगे, केडीसीसी बँक संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँक संचालक असिफ फरास, कागल तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवानंद माळी, प्राथमिक जिल्हा शिक्षक बँकेचे अध्यक्ष जी एस पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे व जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य सुकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश तोडकर, संभाजी ब्रिगेड सदस्य व पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, कागल तालुका संघाचे राजू माने , कागल शहराध्यक्ष संजय चितारी, कागल तालुका युवक माजी अध्यक्ष विकास पाटील, कागल तालुका युवक अध्यक्ष निलेश शिंदे, सरपंच मयुर आवळेकर, कागल शहर उपनगराध्यक्ष सौरभ पाटील,अजित कांबळे,अस्लम मुजावर,संजय ठाणेकर, पक्षप्रतोद नितीन दिंडे, नगरसेवक सर्वश्री सतीश घाडगे,आनंदा पसारे,बाबासाहेब नाईक, विवेक लोटे, प्रवीण काळबर, कागल शहर युवक अध्यक्ष सागर गुरव,मधुकर पाटील,दत्ता पाटील – केनवडेकर, रंगराव पाटील, सुनील माळी, गंगाराम शेवडे, संजय फराकटे, सतीश पोवार, सुनिल माने, मेघा वाघमारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.