भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मार्फत देशात राबविण्यात येत असलेल्या एआयसीटीई सीआयआय २०२० क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर हे सर्वोच्च ठरले. त्याबद्दल नवी दिल्ली येथे प्लॅटिनम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
     शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयमध्ये भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय सीआयआय २०२०च्या सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार सलग तीन वर्षे मिळाला.
     महाविद्यालयाच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांच्यासह भारती विद्यापीठाचे कार्यवाह नामदार डॉ. विश्वजीत कदम, प्र कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *