कोल्हापूर • प्रतिनिधी
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल कोल्हापूर येथे डॉ. पतंगराव कदम यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात आली.
डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त वसंतराव भोसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य व भारती सहकारी बँक लि.चे संचालक डॉ.एच. एन. मोरे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, अत्यंत महत्त्वाकांक्षी व संयमी व्यक्तिमत्व असे डॉ. पतंगराव कदम यांची ख्याती आहे. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वच शिकवण्याचे न्यायचे हा त्यांचा ध्यास होता. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्रात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी एक साम्राज्य उभे केले. आता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी व कार्याबद्दल मी आपणास सर्वांतर्फे विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम करतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केदार जोशी यांनी केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ.आर. ए. मराठे, डॉ. पी. बी. चवाटे, जे. एस. तांदळे, सौ. ऊमिला शिंदे, बी. वाय. पाटील तसेच इतर शाखेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.