भारतीय जनता युवा मोर्चातर्फे “सेल्फी विथ बाप्पा” स्पर्धेचे आयोजन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारतीय जनता युवा मोर्चातर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच “सेल्फी विथ बाप्पा” या स्पर्धेचे कोल्हापूर शहरामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
     या स्पर्धेमध्ये आपण आपल्या घरगुती गणेशमूर्ती सोबत केलेली आरास, केलेली वेशभूषा या सर्वसमावेशक घटकांचा विचार केला जाणार आहे. तज्ञ परीक्षकांच्या निर्णयाव्दारे अंतिम निकाल घोषित केला जाणार आहे.
       या स्पर्धेसाठी फोटो पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. एक स्पर्धक एकच सेल्फी पाठवू शकतो. निकालांती सर्व सहभागी व विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
     स्पर्धकांनी आपला सेल्फी  ९५७९१७२१११ या नंबरवर पाठवावा.  जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजयसिंह खाडे – पाटील यांनी केले आहे.
‐—

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!