कोल्हापूर • प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखाना एक-दोन वर्षे वगळता गेल्या दहा वर्षांपासून नीट चालत नाही. शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम २६ कोटी रुपये तर कामगारांचा २३ महिने पगार नाही, अशी बिकट अवस्था कारखान्याची झाली असल्याची माहिती भीमा बचाव संघर्ष समितीने दिली. समितीचे बाळासाहेब लोकरे, शिवाजी चव्हाण व सतीश भोसले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
ते म्हणाले की, भीमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर ता.मोहोळ, जि. सोलापूर या कारखान्यात दहा वर्षांपासून मिसमॅनेजमेंटने कारभार सुरू आहे. कारखान्याचे एक्सपायशन केले तरी तो पूर्ण क्षमतेने चालत नाही. सोलापूर जिल्ह्यात एकनंबरची रिकव्हरी असलेला हा कारखाना नीट चालत नसल्याने कामगार कामावर येत नाहीत. कामगारांचा २३ महिने पगार दिलेला नाही. शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम २६ कोटी रुपये देणे आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांचे सन २०१६-१७ पासून फायनल पेमेंट नाही. तसेच भविष्य निर्वाह निधी जुलै २०१९ पासून भरलेला नाही.
कारखान्यावर दोन वेळा आर.आर.सी.ची कारवाई झाली आहे. संचालक मंडळाची बैठकही होत नाही. भागातील ट्रॅक्टर मालकांना फसवून बॅंक ऑफ इंडिया शाखा कुरूल कर्ज काढले आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी आमची लढाई सुरू असून बिकट अवस्था झालेल्या या कारखान्याच्या कारभारास विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
——————————————————- Attachments area
![]() | ReplyForward |