कागलमध्ये सनगर व धनगर समाजाच्या सभागृहाचे भूमिपूजन

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कागलमध्ये सनगर समाज व धनगर समाजाच्या सांस्कृतिक सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने नागरी दलितेतर विकास निधीतून या हॉलसाठी वीस लाख रुपये मंजूर झाले आहेत.
      मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात म्हणाले,  दोन्ही समाजाच्या या सुसज्ज हॉलचा उपयोग समाज बांधवांच्या घरगुती कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी चांगल्या पद्धतीने होईल.
      यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, नवल बोते, रामचंद्र गोरडे, आकाराम शेळके, गंगाराम शेवडे, सुरेश शेळके,  नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक विवेक लोटे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक सौ. जयश्री शेवडे, नगरसेवक सौ. माधवी मोरबाळे, विजय सनगर, सम्राट सनगर, अमर सनगर, महेश सनगर, जयसिंग सनगर, चंद्रकांत सनगर, कृष्णा हेगडे, शिवाजी मोरे, अजित निंबाळकर, कोंडीबा शेळके आदी प्रमुख उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!