बिंबा’ वेबसिरीजला प्रेक्षक मोठी पसंती देतील: दिग्दर्शक मिलिंद सकपाळ


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य गगनबावडा येथे ‘बिंबा’ या हिंदी वेबसिरीजचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित चित्रीकरण ३० मार्चपर्यंत होऊन मे महिन्याच्या अखेरीस प्रदर्शित होईल. ही वेबसिरीज प्रणय, भय व थरार अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्यामुळे प्रेक्षक या वेबसिरीजला मोठी पसंती देतील, असा विश्वास ‘बिंबा’ वेबसिरीजचे दिग्दर्शक मिलिंद सकपाळ आणि निर्माते जीवन जाधव यांनी व्यक्त केला.
    ते म्हणाले की, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसिरीज प्रदर्शित होत आहेत. या  अंतर्गत पिंगपॉग एंटरटेनमेंट चॅनेलच्यावतीने बिंबा या हिंदी वेबसिरीजची निर्मिती करण्यात येत आहे. वेबसिरीजचे ८ मार्चला गगनबावडा येथे चित्रीकरण सुरू होऊन आता ते पूर्ण होत आले आहे. राहूल डोर्ले यांनी लेखन केलेल्या वेबसिरीजचे चित्रीकरण निशांत भागवत यांनी केले आहे. एका मानसिक विकृत तरूणाच्या कारनाम्यावर आधारित असलेल्या या वेबसिरीजमध्ये अनिकेत विश्वासराव आणि युविका चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असून राहूल सिंग हे विशेष भूमिकेत आहेत.
     पत्रकार परिषदेला निर्माते जीवन जाधव, भरत कालीटा, नायक अनिकेत विश्वासराव यांच्यासह वेबसिरीजचे कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *