कोल्हापूर • प्रतिनिधी
बिंदू चौक परिसरात रस्त्यावर फिरणाऱ्यांवर मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. याठिकाणी ४ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जिवबा नाना जाधव पार्क येथील अवनी बाल संस्था संचलित मुलींच्या बालगृहातील १४ जणींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शहरात संचारबंदी आहे, परंतु विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ३५ नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ४ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर जिवबा नाना जाधव पार्क येथील अवनी बाल संस्था संचलित मुलींच्या बालगृहातील २२ जणींची रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये ८ जणींचे अहवाल निगेटिव्ह तर १३ मुलींचे व एका शिक्षिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
———————————————–