बिंदुमाधव जोशी यांचा स्मृतीदिन सामाजिक उपक्रमांनी साजरा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्राहक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष  ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उर्फ नाना यांचा सहावा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
      कोरोना या संसर्गजन्य आजाराचे सावट असताना गरीब, उपेक्षित आणि वंचित घटकातील गरजूंना एक हात मदतीचा पुढे करत अन्नदान करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर महानगर आणि जिल्ह्याच्यावतीने १० मे या स्मृतिदिनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
      यामध्ये ऐश्वर्या मुनीश्वर यांचे सेवा निलायम अन्नछत्रास २५ किलो साखर, ३२ किलो बासमती तांदूळ, १५ किलो तूरडाळ, १२ लिटर सुर्यफूल तेल, २५ किलो गहू, १७ किलो बारीक रवा, १ किलो चटणी व ५ किलो मीठ असे  साहित्य दिले.
     पंचगंगा स्मशानभूमी येथे महापालिका उपायुक्त निखिल मोरे व  सहा.आयुक्त चेतन कोंडे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेस ५००० शेणी देण्यात आल्या.
      लक्ष्मीपुरी, रिलायन्स मॉल पाठीमागे असलेल्या जाणीव फौंडेशनला १५ किलो साखर, ३२ किलो बासुमती तांदूळ, १२ लिटर सुर्यफूल तेल, १५ किलो मूगडाळ, ३२ किलो सुजी रवा, १ किलो चहा पावडर, १० किलो गूळ, १ किलो चटणी व ५ किलो मीठ असे साहित्य दिले.
      कनाननगर येथील २७ वारांगनांना  कोरडा शिधा वाटप करण्यात आला. यामध्ये साखर, तांदूळ, पोहे, शाबू, सरकी तेल, मुगडाळ, तूरडाळ,     मसूरडाळ, शेंगदाणे, गहू पीठ व मीठ असे साहित्य असलेले प्रत्येकी एक किट देण्यात आले.
      बिंदुमाधव जोशी यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी महानगर अध्यक्ष आणि प्रांत सदस्य एन. ए. कुलकर्णी, प्रांत सदस्य प्रसाद बुरांडे, प्रांत समिती प्रमुख संदिप जंगम, जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व उपक्रमप्रसंगी जिल्हा उपाध्यक्षा सुप्रिया दळवी, महानगर सचिव लक्ष्मीदास जोशी, सदस्य विनायक वाळवेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!