कोल्हापूर • प्रतिनिधी
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत साजरी करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार पी.एन.पाटील व शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर महिला अध्यक्ष संध्या घोटणे, जिल्हा सचिव संजय पोवार वाईकर, किशोर खानविलकर, रंगराव देवणे, यशवंत थोरवत, सुशिल पाटील कौलवकर, दिपक थोरात, अक्षय शेळके, लिला धुमाळ माजी नगरसेविका, पुजा आरडे, महादेव जाधव, तानाजी लांडगे, उदय पोवार, विनायक पाटील, एन.एन.पाटील,
दयानंद देसाई, आदित्य कामत, राजू लाखे, प्रदिप शेलार उपस्थित होते.