चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक दायित्वाचा!

              

 

• कणेरीमठ येथे उभारणार अद्ययावत ऑक्सिजन प्लांट
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस सामाजिक जाण ठेवून सर्वसामान्य जनतेच्या, निसर्गाच्या, आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच संपन्न होत आलेला आहे. यावर्षीचाही वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून कणेरीमठ येथे अद्यावत ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून साजरा होणार आहे.
       यापूर्वी केलेल्या वाढदिवसांमध्ये रद्दीच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारून ती रद्दी व आपल्याकडील मदत देवून स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्टर प्रदान करण्यात आला. जीवनरक्षक दिनकर कांबळे यांचा विमा उतरवण्यात आला. रोपांच्या माध्यातून शुभेच्छा स्वीकारून, शहरातील वाढते प्रदूषण आणि तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज ओळखून जवळपास ३५ हजार रोपे केएसबीपीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी लावून शहराचे सौदर्य खुलवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. शेतकऱ्यांना खते मिळाली तर त्याला थोडासा हातभार लावता येईल उद्देशाने खतांच्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना युरीया या दाणेदार खताचे वितरण करण्यात आले. वयोवृद्ध लोकांची सेवा करणारे सावली केअर सेंटर उभारणीसाठी मदत. अशा नाविन्यपूर्ण कामातून संकल्प बांधून वाढदिवस साजरा करण्यात येतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यम उपक्रम म्हणजे ताप मोजण्यासाठी लागणारे थर्मामीटर आपण गरजू, दु्र्लक्षित घटकांना दिले तसेच अनेकांना थर्मल मशीन, मोठया सोसायटी व अपार्टमेंट ठिकणी सॅनिटायझर स्टँड ही देण्यात आले.
      आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा यावर्षीचा १० जून रोजी होणारा वाढदिवस ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून साजरा होणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या पार्श्वभूमीवर कणेरीमठ येथील प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व चंद्रकांतदादा पाटील यांनी कणेरी येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याचा संकल्प केला असून या प्लांट उभारणी करीता सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूरमधील जनता ही शाहूप्रेमी असून प्रत्येक संकटाच्या काळात आपले दातृत्व दाखवून देत असते. म्हणून यावर्षीचा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आपण कणेरी मठावरील ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून साजरा केला जाणार आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनची कमतरता कमी करण्यासाठी व इतरवेळेस कन्व्हर्टरमधून ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून अन्यत्रही उपयोगात आणता येईल.
      ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी यावेळच्या या उपक्रमात आपणही सहभागी होऊन दादांना शुभेच्छा देण्यासाठी कणेरीमठाच्या ‘सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन’, स्टेट बँक ऑफ इंडिया, करंट खाते क्र.३६४८५४२३४३८ IFSC कोड SBIN 00007958, एम.आय.डी.सी. गोकुळ शिरगांव या खात्यावर चेक स्वरूपात देऊन या सामाजिक उभारणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाढदिवस समितीच्यावतीने राहूल चिकोडे यांनी केले आहे.
———————————————– 

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *