मागण्या मान्य झाल्यामुळे भाजपा कार्यकर्ते राजू जाधव यांचे आमरण उपोषण समाप्त

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
       राधानगरी रोडवरील अनेक उपनगरात झालेली रस्त्यांची दुर्दशा आणि काही कॉलन्यांमध्ये दहा वर्षे असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न याच्या सोडवणुकीकरिता भाजपाचे कार्यकर्ते राजू जाधव यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक उत्तरे मिळाल्यामुळे आणि दोन रस्त्यांचे काम सुरू झाल्यामुळे भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता अजय साळुंखे, जिल्हा परिषद शाखा अभियंता के. व्ही. पाटील, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोळेकर आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आज स्थगित करण्यात आले.
       कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ८१ मधील जिवबानाना जाधव पार्कला जाणारा रस्ता व राधानगरी रोड ते कळंब्याला जोडणारा डीपी रोड जयसिंगराव इंगवले कॉलनी त्याचबरोबर भागातील सर्व अमृत योजना ड्रेनेज लाईन गटर्स व इतर समस्यांबाबत मनपाच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. यासाठी येथील नागरिक सातत्याने आंदोलन करीत आहेत. अनेकवेळा निवेदने देऊन, रस्ता रोको करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. २४ फेब्रुवारीला यासंदर्भात निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजपाचे राजू जाधव यांनी दिला होता. त्यास कोणताही प्रतिसाद न मिळल्यामुळे गेले चार दिवस राजू जाधव उपोषण करत होते.
      काल धनंजय महाडिक युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि जलाभियंता अजय साळुंखे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता के.व्ही. पाटील यांनीही भेट दिली. त्यावेळी एक रस्ता जिल्हा परिषदेने आणि एक रस्ता महानगरपालिकेने करण्यावर सहमती झाली होती. जिल्हा परिषदकडून अमर विकास सोसायटी ते जीवबानाना जाधव पार्क रस्त्यासाठी तातडीचे २५ लाख मंजूर करण्यात आले. परंतु पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन सुरूच होते. आज राजू जाधवांची प्रकृती खालावल्यामुळे भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, माजी गटनेते अजित ठाणेकर, उपाध्यक्ष राजू मोरे आणि मंडल सरचिटणीस सचिन सुतार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व समस्या समजून घेतल्या. त्यानंतर सर्वांनी महानगरपालिकेत जाऊन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले व तोडगा काढण्याची विनंती केली.
       त्यानंतर अमृत योजनेतील लाईनमधून पाणी देण्याचे ठरले. हा निर्णय आंदोलनकर्त्यांना कळविण्यात आला आणि त्यांच्या सहमतीनंतर सर्व मान्यवरांनी उपोषणस्थळी जाऊन राजू जाधव यांना लिंबू सरबत दिले व उपोषण सोडले केले.
      या आंदोलनास  रिंकू देसाई, सुनील वाडकर, सुनील साळोखे, रवि पाटील, सचिन जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सुनील माने, सागर साठे, निखिल पाटील, विरूपक्ष पट्टणशेट्टी, महादेव मस्तुद, अमोल टिपुगडे, प्रथमेश सुतार तसेच
स्मिता खाडे, शोभा पाटील, पद्मजा माने, सुनीता तांदळे, फाकिरवा कोडलीवाड आणि जिवबानाना जाधव पार्क, अमर विकास सोसायटी, जयसिंगराव इंगवले कॉलनी, मुक्ताईनगर व भागातील सर्व नागरिक या अमरण उपोषणात सहभागी झाले होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!