भाजपाने विचारला शिक्षण उपसंचालकांना जाब

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाच्या संकटामुळे सर्व घटकांवर याचा परिणाम होऊन आर्थिक चक्र मंदावले आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीयाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. त्यातच सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात झाली असून पुन्हा शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याचा शिक्षण उपसंचालकांना जाब विचारण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
    भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एकत्र येऊन फी वाढीच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
     शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर रस्त्यावर सुरु असलेल्या भाजपाच्या आंदोलनाठिकाणी शिक्षण उपसंचालक एड.डी.सोनवणे, सुभाष चौगले सहाय्यक निरीक्षक, एस.डी.पवार शिक्षण उपनिरीक्षक यांना बोलवून भाजपाच्यावतीने जाब विचारण्यात आला. यानंतर शिक्षण उपसंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये ५०% फी माफ झाली पाहिजे, फी वसुली साठी सक्ती करणा-या शिक्षण संस्थांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
      आजच्या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलना नंतर शिक्षण उपसंचालक एस.डी.सोनवणे यांनी सोमवारी फी वाढी संदर्भात शिक्षण अधिकारी यांची तातडीची बैठक आयोजित करत असून यामध्ये भाजपाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आलेल्या सूचना त्यांना सांगून या फी दरवाढीबाबत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.
     यावेळी जिल्हा अध्यक्ष राहूल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, मारुती भागोजी, राजू मोरे, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, मामा कोळवणकर, विजय खाडे, गायत्री राऊत, आसावरी जुगदार, अतुल चव्हाण, ओंकार खराडे, विवेक वोरा, गिरीष साळोखे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!